इस्रायलचे गाझापट्टीत हल्ले सुरूच; 16 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष रोज नवनवी वळणे घेत आहे. इस्रायली सैन्याने आज गुरुवारी दक्षिण गाझापट्टीत केलेल्या हल्ल्यात 16 नागरिकांचा मृत्यू झाला. हमासच्या ताब्यात असलेल्या ओलीसांमध्ये अनेकांची तब्येत बिघडली असून त्यांना औषधांची गरज आहे. मात्र, फ्रान्स आणि कतारकडून केला जाणारा औषधपुरवठा ओलीसांपर्यंत पोहोचलेला नसून इस्रायलने त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ओलीसांमधील नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये गेल्या 100 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत 24 हजारांहून अधिक पॅसेस्टिनींचा मृत्यू झाला असून 23 लाख लोकांनी त्यांची घरे सोडली आहेत.