दिल्लीतल्या इस्रायल दुतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या अब्दुल कलाम मार्गावर बॅरिकेड लावले असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. माध्यमानांही या भागात प्रवेश नाकारण्यात आला आहे. इराणने इस्रायलवर हल्ला केल्याने मध्य पुर्वेत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान हिंदुस्थानातील इस्रायलच्या दुतावासावर कुठलाही हल्ला होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे.
या भागात आंदोलन होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी इस्रायल दुतावासाची सुरक्षा वाढवली आहे. तसेच दुतावासाकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षात या भागात दोन आईडी स्फोट झाले होते.
मध्य पुर्वेत युद्धाचे वातावरण पाहता हिंदुस्थान सरकारने इस्रायल आणि इराणमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांना सुचना जारी केली आहे. यापूर्वी विदेश मंत्रालयाने इस्रायलमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानींना सूचना जारी केली होती.