Israel Iran War – युद्ध थांबणार की वादळापुर्वीची शांतता; ट्रम्प यांच्या यू टर्नने जागतिक समीकरणे बदलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध आता महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपले आहे. इराणने हार्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. जर या काळात इराणने सामुद्रधुनी खुली केली नाही तर त्यांच्या उर्जाक्षेत्रांवर हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला होता. तर इराणनेही अमेरिकेला आक्रमक प्रत्युत्तर देत आमच्या उर्जा क्षेत्रावर हल्ला झाला तर आखाती देशातील सर्व उर्जा क्षेत्रावर हल्ला चढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, आता आपल्या अल्टिमेटमपासून यू टर्न घेत ट्रम्प यांनी पुढील पाच दिवसांसाठी वीज प्रकल्पांवर हल्ला होणार नाही अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषमेमुळे जागतिक समीकरणे बदलली आहेत.

अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक प्रयत्नांना गती मिळत असल्याचे दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर प्रस्तावित लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी दोन्ही देशांमधील अलीकडील चर्चा सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शांततेचे संकेत मिळथ आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारा कोणताही लष्करी हल्ला पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या अत्यंत सकारात्मक चर्चेनंतर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव पूर्णपणे सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये गंभीर चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, “मध्य पूर्वेतील सध्याच्या संघर्षावर संपूर्ण तोडगा काढण्याच्या उद्देशाने, गेल्या दोन दिवसांपासून इराणसोबत अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली आहे. दोन्ही देशांमधील या सखोल आणि तपशीलवार चर्चेचा सकारात्मक सूर लक्षात घेता, जी संपूर्ण आठवडाभर सुरू राहील, मी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला इराणच्या वीज प्रकल्पांवर आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व लष्करी हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत.

ट्रम्प यांनी इराणसोबतच्या शांतता करारासाठी आपल्या दोन माजी दूतांवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी स्टीव्ह विटकॉफ आणि त्यांचे जावई, जेरेड कुशनर यांना इराणसोबत वाटाघाटी करण्यासाठी अधिकृत केले आहे. हे दोन्ही दूत इराणसोबत वाटाघाटी करतील. इराणने यापूर्वी स्वीकारण्यास नकार दिलेल्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा ते प्रयत्न करतील.

जागतिक समीकरणे बदलली
ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे काही काळातच जागतिक समीकरणे बदलली आहेत. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर सोमवारी सकाळी घसरण झालेल्या सोनेचांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. तसेच वायदे बाजारात कच्चे तेल आणि नेसर्गिक वायूंच्या किमतीत मोठी घट होत आहे. त्याचप्रमाणे गिफ्ट निफ्टीमध्येही 800 अंकांची वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी बाजारात जबरदस्त तेजी दिसण्याची शक्यता आहे. तसेच या घोषणेतून जागतिक सकारात्मक संकेत जात असल्याने अर्थव्यवस्थेवरील सावट दूर होण्याची शक्यता आहे.