Israel Iran War – आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल…; ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या सहा आठवड्यांपासून अमेरिका, इस्रायल इराण युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे, त्याची मुदत आता संपणार आहे. त्याआधीच, ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तसेच एक मोठी धमकी दिली आहे.

ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली आहे की, आज रात्री एका संपूर्ण संस्कृतीचा अंत होईल, जी पुन्हा कधीही पूर्ववत करता येणार नाही. मला हे घडावे असे वाटत नाही, पण कदाचित ते घडेल. आता सर्व देवाच्या हातात आहे, असे ट्रम्प म्हणाले.

गेल्या सहा आठवड्यांपासून इराण युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे, ज्याची मुदत आता संपणार आहे. पण त्याआधीच, ट्रम्प यांनी इराणला आणखी एक मोठी धमकी दिली आहे.

ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले, आम्ही आता इराणमधील राजवट बदलली आहे. तिथे पूर्वीपेक्षा अधिक हुशार आणि कमी कट्टर लोक आहेत. कुणास ठाऊक, कदाचित काहीतरी क्रांतीकारक घडेल? आज रात्री आपल्याला कळेल. हा जागतिक इतिहासातील सर्वात महत्त्वाचा क्षण असू शकतो. ४७ वर्षांची खंडणी, भ्रष्टाचार आणि मृत्यू अखेर संपतील. देव महान आहे. कृपया इराणी जनतेला आशीर्वाद द्या, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनुसार आज रात्री युद्धाबाबत आणि होर्मुझ कराराबाबत महत्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. नेहमीप्रमाणे ट्रम्प इराणवर दबाव टाकत धमकीही देत आहे. आता ट्रम्प यांच्या धमकीला इराण कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, यावरच युद्धाची पुढील दिशा ठरणार आहे.