इस्रायलच्या हल्ल्यात 59 जणांचा मृत्यू

हमासविरोधातील कारवाई तीव्र करत इस्रायलने गाझापट्टीत मंगळवारी केलेल्या हल्ल्यात 59 जणांचा मृत्यू झाला. यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. इस्रायलने विस्थापित पॅलेस्टिनींना आश्रय देणाऱया शाळेला टार्गेट केले. यात नऊ महिला आणि तीन मुलांसह 27 जणांचा मृत्यू झाला. युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील शाळेवर हल्ला होण्याची ही पाचवी वेळ होती. आणखी एका शाळेला इस्रायलने लक्ष्य केले. त्यात 16 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय अन्य ठिकाणी झालेल्या हल्ल्यात किमान 16 जणांचा मृत्यू झाला.