
सामना ऑनलाईन । श्रीहरिकोटा
इस्रोने रविवारी ‘पीएसएलव्ही-सी 42 या प्रक्षेपकाच्या साहाय्याने नोव्हा एसएआर आणि एस-14 हे दोन ब्रिटिश उपग्रह अवकाशात पाठवून अवकाश संशोधन क्षेत्रातील आर्थिक उलाढालीत अग्रस्थान पटकावले. सतीश धवन अवकाश केंद्रातून रात्री साडेदहाला उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
आजच्या प्रेक्षपणामुळे 300 अब्ज डॉलरच्या जागतिक अवकाश संशोधन क्षेत्रातील सर्वाधिक हिस्सेदारी मिळवण्याचा बहुमान हिंदुस्थानला मिळाला आहे. ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपकाचे हे 44वे उडाण होते. उपग्रह सर्वाधिक कमी खर्चात अवकाशात पाठवण्याचा मानही ‘इस्रो’कडे आहे. गेल्या तीन वर्षांत इस्रोने 5 हजार 600 कोटींची कमाई केली आहे.
summary- isro broadcast two satellites in space






















































