इस्रोने लॉन्च केला RISAT-2BR1 उपग्रह; हिंदुस्थानला होणार ‘हे’ फायदे 

379

हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था इस्रोने रिसॅट मालिकेतील RISAT-2BR1 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. इस्रोने आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथे मंगळवारी दुपारी 3 वाजवून 25 मिनिटांनी पीएसएलव्ही सी – 48 रॉकेटसह याचे प्रक्षेपण केले आहे. या उपग्रहाला ‘स्पाय उपग्रह’ असे म्हटले जाते.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाला अंतराळात ५७६ किलोमीटरच्या कक्षेत 37 डिग्रीवर स्थापित केले जाईल. हा उपग्रह स्थापित झाल्यानंतर देशात घुसखोरी करणाऱ्यांवर पाळत ठेवता येणार आहे.

RISAT-2BR1 ची काय आहे खासियत

RISAT-2BR1 मध्ये खास सेन्सरमुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. पाकिस्तानातून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी, सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे तळ याची खडानखडा माहिती मिळू शकेल. तसेच कुठल्याही वातावरणात ढगांच्या आडूनही फोटो काढण्यास RISAT-2BR1 सक्षम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या