ISRO रचला इतिहास; SSLV-D3 रॉकेटचे यशस्वी उड्डाण

देशभरात गुरुवारी स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्यात दिवशी ISRO ने एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ISROने शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून SSLV-D3 रॉकेटचे प्रक्षेपण केले. या मोहिमेअंतर्गत देशाचा नवीन पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-8 आणि एक छोटा उपग्रह SR-0 DEMOSAT प्रक्षेपित करण्यात आला. हे दोन्ही उपग्रह पृथ्वीपासून 475 किलोमीटर उंचीवर असलेल्या वर्तुळाकार कक्षेत स्थापित केले जातील.

इस्त्रोने लाँच केलेले नवे SSLV-D3 हे रॉकेट ऐतिहासिक असल्याचे बोलले जात आहे. SSLV चे हे तिसरे उड्डाण आहे. आणि भारताच्या छोट्या उपग्रह प्रक्षेपण उद्योगासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकते. याव्यतिरिक्त EOS-8 आणि SR-0 DEMOSAT चे यशस्वी प्रक्षेपण आणि ऑपरेशनमुळे अंतराळ तंत्रज्ञानामध्ये हिंदुस्थानची आत्मनिर्भरता आणखी बळकट होईल.

EOS-8 त्यात तीन उपग्रह पाठवण्यात आले. सॅटेलाइट म्हणजे काय?

EOS-8  हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. ज्याचा उद्देश पृथ्वीच्या पृष्ठभागावर लक्ष ठेवणे आणि महत्त्वाची माहिती गोळा करणे हा आहे. 175.5 किलोग्रॅम वजनाच्या या उपग्रहामध्ये तीन अत्याधुनिक पेलोड आहेत – इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड (EOIR), ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम रिफ्लेक्टोमेट्री पेलोड (GNSS-R) आणि SiC UV Dosimeter. यामध्ये EOIR उपकरण दिवस आणि रात्रीचे इन्फ्रारेड छायाचित्रे देईल. या चित्रांमुळे पृथ्वीवरील आपत्तींची माहिती मिळेल.

मिशनचा देशाला कसा फायदा होईल?

या मोहिमेचा कालावधी एक वर्षाचा आहे. SSLV-D3 च्या प्रक्षेपणानंतर, SSLV ला पूर्णपणे कार्यरत रॉकेटचा दर्जा प्राप्त होईल. यापूर्वी या रॉकेटची दोन उड्डाणे झाली आहेत. SSLV-D1 चे पहिले उड्डाण 7 ऑगस्ट 2022 रोजी झाले. पुढील उड्डाण म्हणजेच SSLV-D2 10 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आली. यामध्ये EOS-07, Janus-1 आणि AzaadiSAT-2 अशी तीन उपग्रह पाठवण्यात आली.