
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज पुन्हा इतिहास रचला. इस्रोने आंध्रच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ पेंद्रातून अमेरिकेचा 6,100 किलो वजनाचा ‘ब्लूबर्ड ब्लॉक 2’ हा उपग्रह लाँच केला. एलव्हीएम-3 या बाहुबली रॉकेटने ही कामगिरी केली.
प्रक्षेपणानंतर सुमारे 15 मिनिटांनी हा उपग्रह रॉकेटपासून वेगळा झाला आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 520 किमीवर लो अर्थ ऑर्बिटमध्ये स्थिरावला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली.
इस्रोच्या ‘एलव्हीएम-3’ या रॉकेटने आतापर्यंत आठ उड्डाणे केली असून त्यातील तीन उड्डाणे व्यावसायिक मोहिमेचा भाग आहेत. याच रॉकेटने 2023 मध्ये चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचवून इतिहास रचला. यापूर्वी इस्रोने चांद्रयान-2 आणि वनवेब या दोन मोहिमाही यशस्वी केल्या आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 72 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.
ब्लूबर्ड का महत्त्वाचा?
ब्लूबर्ड ब्लॉक-2 हा पुढील पिढीचा कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी थेट स्मार्टपह्नवर आणण्याच्या उद्देशाने त्याची रचना करण्यात आली आहे. या उपग्रहामुळे 4 जी, 5 जी व्हॉइस कॉल, व्हिडीओ कॉल, मेसेजिंग, स्ट्रीमिंग आणि डेटा सेवा सक्षम होणार आहे.




























































