
सध्या महाराष्ट्रातील सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमुळे संपूर्ण देशाचे लक्ष राज्याकडे लागले आहे, मात्र दिल्लीला हे महाग पडणार आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीने राज्यावर नजर टाकली तेव्हा नाश झाला आहे. त्यामुळे याचे गंभीर परिणाम दिल्लीला भोगावे लागतील. त्यामुळे तमाशा थांबवा, असा गर्भित इशारा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे.
ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे भाजपचे तीन कार्यकर्ते आहेत. भाजप केंद्रातील सरकारच्या भरवशावर राष्ट्रपती राजवट लागू करू पाहत आहे. जर केंद्राने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली तर याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील. शिवसेना पार्टी संपवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. शिवसेनेच्या भरवशावर जे मोठे झाले ते आज शिवसेना संपवू पाहत आहेत, असे म्हणत नाना पटोले यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे गटतील एका आमदाराला 50 करोड देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे आमदार बोलत आहेत ते काही पैशावर आणि काही ईडीच्या भरवशावर बोलत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.




























































