माटुंग्याच्या आयटीसीमधील ऑनलाइन परीक्षा रद्द करा! युवा सेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा रद्द करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले असतानाही माटुंगा येथील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयटीसी) ही संस्था विद्यार्थ्यांची दिशाभूल करून ऑनलाईन परीक्षा घेत आहे. ती तातडीने रद्द करण्यात यावी अशी मागणी युवा सेनेने केली आहे.

युवासेनाप्रमुख व राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना यासंदर्भात निवेदन दिले. ऑनलाईन परीक्षा तातडीने रद्द कराव्यात असे आदेश आयटीसीच्या कुलगुरूंना द्यावेत अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.