जे. जे. शूटआऊट प्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. 32 वर्षांनंतर ही कारवाई केली असून पोलिसांनी यूपीतल्या कारागृहातून त्रिभुवन सिंह ऊर्फ प्रधान उैर्फ श्रीपती श्रीकांत (62)या शूटरचा ताबा घेऊन त्याला मुंबईत आणले.
12 सप्टेंबर 1992 रोजी जे. जे. इस्पितळात रात्रीच्या वेळी दाऊदने त्याच्या शूटर्सकरवी गोळीबार घडवून आणला होता. अरुण गवळी टोळीतील शैलेश हळदणकर व बिपीन शेरे हे दोघे जे. जे. इस्पितळात उपचार घेत होते. त्यांच्यावर दाऊदने हल्ला घडवून आणला होता. त्यावेळी शूटर्सनी या दोघांच्या संरक्षणसाठी तैनात असलेल्या दोघा पोलिसांवर एके 47 रायफलमधून गोळय़ा झाडल्या. त्यानंतर बिपीन आणि शैलेशवर गोळीबार केला होता. त्यात बिपीन वगळता दोन पोलीस आणि शैलेश जागीच मारले गेले, तर गंभीर जखमी झालेला बिपीन नंतर उपचारादरम्यान मृत पावला. या हल्ल्यात सहभागी असलेला त्रिभुवन सिंह हा यूपीत जाऊन लपला होता. त्यानंतर तेथील पोलिसांनी त्याला पकडल्याने तो तेथील अन्य गुह्यांत कारागृहात होता.