
हिंदुस्थान-पाकिस्तानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा पाकड्यांच्या बॅट कमांडोजचा डाव सुरक्षा दलाने उधळून लावला आहे. या घुसखोरांवर ग्रेनेड फेकून जवानांनी त्यांचा खात्मा केला आहे. हिंदुस्थानी सैन्यदलाने या कारवाईचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.
हा व्हिडीओ 12-13 सप्टेंबरच्या रात्रीच्या वेळेचा आहे. यात पाकिस्तानची बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) सीमारेषेवरून घुसखोरी करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच या बॅट कमांडोजवर जवानांनी बॅरेल ग्रेनेड लाँचरचा वर्षाव करत त्यांचा खात्मा केल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे.
केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आयाचपार्श्वभूमीवर हे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमारेषेवरुन घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. पण हिंदुस्थानी सैन्याने प्रत्येकवेळी पाकड्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावल्याने पाकिस्तान अधिकच चवताळला आहे. हिंदुस्थानी जवानांनी 10-11 सप्टेंबरला पाकिस्तानच्या पंजाब रेजिमेंटच्या एका जवानाला खात्मा केला होता. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने 11, 12 आणि 13 सप्टेंबरला रात्रीच्या वेळेस सीमारेषेवरून पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर 12-13 सप्टेंबरला जवानांनी आणखी एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घातले.
पाकिस्तानकडून गुरेज, माछिल, तंगधार, केरन, उरी, पूंछ,नौशेरा, सुंदरबनी, आरएस पुरा, रामगढ, कठुआ या सेक्टरला लक्ष्य केले जात आहे. या भागात 250 हून अधिक दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली आहे. दरम्यान ही घुसखोरी रोखण्यासाठी हिंदुस्थानी सैन्याने ऑगस्टमध्येच कालीघाटी कम्युनिकेशन सेंटर उघडले आहे. यातून मिळणाऱ्या माहितीवरूनच जवान पुढील योजना आखत आहेत.
दरम्यान, उरी दहशतवादी हल्लाला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत. 18-19 सप्टेंबर 2016 साली रात्रीच्या वेळेस पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथील लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. ज्यात 19 जवान शहीद झाले होते. त्यानंतर दहा दिवसांनंतरच हिंदुस्थानने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. यात पाकिस्तानमधील लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आले होते.
#WATCH Army sources: Infiltration or attempted BAT(Border Action Team) action by Pakistan on 12-13 Sept 2019, was seen&eliminated. In video, Indian troops can be seen launching grenades at Pak’s SSG(Special Service Group) commandos/terrorists using Under Barrel Grenade Launchers. pic.twitter.com/KOnYJPWyV8
— ANI (@ANI) September 18, 2019
























































