काय सांगता…16 हजारांत विकला फणस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फणस खायला खूप जणांना आवडतं. फणसाची किंमत साधारण 100 ते 200 रुपये असते. पण तुम्हाला जर कोणी एक फणस तब्बल 16 हजार रुपये किमतीत मिळतोय, असं सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. लंडनमध्ये एका फणसाला चक्क 160 पौंड म्हणजे जवळपास 16 हजार रुपये किंमत मिळाली आहे. तिथल्या जुन्या अशा बोरो मार्केटमध्ये एक फणस तब्बल 16 हजार रुपयांना विकला गेला आहे. ब्रिटनमध्ये फणस महाग असण्याची अनेक कारणं आहेत. ब्रिटनसारख्या थंड प्रदेशात फणस पिकवला जात नाही. त्यामुळेच त्याला मागणी जास्त आहे. फणस शिजवल्यानंतर मांसासारखा दिसत असल्याने त्याचा वापर वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही फणसाची मागणी वाढत आहे. फक्त ब्रिटनमध्ये शाकाहारी व्यक्तींची संख्या जवळपास 35 लाख असून, ती दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून फणसाचा व्यवसायही वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.