जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा, झाडे उन्मळून पडली, घरावरील पत्रे उडाली

जालना जिल्ह्यात रविवारी 4 जून रोजी दुपारी एकच्या सुमारास रिमझिम पाऊस पडला त्यानंतर तुफान वादळ-वारे वाहू लागले. या वादळाचा वेग भयंकर असल्याने उभे झाले उन्मळून पडली. तर जिल्ह्यातील काही भागात शेतातील विद्युत पुरवठा करणारे खांब कोसळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. मात्र पाऊस रिमझिम स्वरूपाचा झाल्याने उकडा निर्माण झाला आहे.

जालना, बदनापूर, जाफराबाद, भोकरदन, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा तालुक्यातील अनेक भागात हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जाफराबाद व परिसरात लहरी निसर्गाने आज हद्द केली असून तब्बल सव्वा घंटा वादळी वारा व ढगाळ वातावरणाने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले. आकाशात धुळीचे लोट. दोन किलोमीटर अंतरावरून दिसत होते. यावर्षी संपूर्ण उन्हाळ्यावर दर पंधरा दिवसाला आठ दिवसाला पावसाने हजेरी लावली परिणामी शेतकऱ्यांचे रब्बी पीक उभे पिकआडवे झाले. गहू, हरभरा, मक्का, पावसामुळे काळपट पडले. आज दीड वाजेच्या सुमारास भर ऊन असताना अचानक वादळी वारा सुरू झाला. वाऱ्याचा वेग इतका होता की बऱ्याच भागात तीन पत्रे जनावरांचे गोठे उडाली, झाडे पडले. जाफराबाद व्यापारी आपल्या दुकानाचे शटर हाताने खाली करून जीव मुठीत ठेवून दुकानाबाहेर थांबलेले होते.

टेंभूर्णीसह परिसरात दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातारण तयार झाले होते. व नंतर २ वाजेच्या सुमारास वादळीवाऱ्याने झाडासह लाईट चे पोल देखील आडवे केलेले बघायला मिळत आहे. सध्या स्थितीत परिसरातील शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगबग सुरू असून नागरणी, वखर पाळी, रोट्याव्हेटर सह पेरणी पूर्व मशागतीची आदी कामे सुरू आहे. अशातच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याची धांदल उडाली उडाली होती.यावेळी शेतातील जनावरांचा चारा, भुसावरील ताडपत्री, गोठ्यावरील पत्रे,शेतातील मिरची लागवडीसाठी आंथरण्यात आलेली मलचींग इत्यादी वास्तूची दाणादाण झाली आहे.