कोरोनाचा परिणाम, बहरलेल्या फुलशेतीवर शेतकऱ्याने फिरविला नांगर

859

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील फुलांची विक्री बुलढाणा, जळगाव, भुसावळ, पुणे आदी ठिकाणी विक्री होते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्‍पन्नही मिळत होते; मात्र कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्‍याने फुलांची विक्री थांबली आहे. यामुळे अनेक शेतात फुले तोडणीअभावी राहिली आहेत त्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना बहरलेल्या फुलशेतीवर जड मनाने नागर फिरवावा लागत आहे .

जालना जिल्ह्यातील वालसावंगी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने झेंडू, गुलाब, शेवंती फुलशेती केली होती. सण-उत्सव, लग्नसराईमळे शेतकऱ्यांनी फुलशेतीला प्राधान्य दिले मात्र कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर मागील वीस दिवसांपासून फुलांची विक्री बंद आहे. त्यामुळे फुलशेतीवर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर संचारबंदीची अंमलबजावणी सुरू असल्‍याने फुलांची विक्री थांबली आहे. यामुळे अनेक शेतात फुले तोडणीअभावी शेत रंगीबेरंगी झाले आहे. विक्रीच होत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून लावलेला खर्च देखील वसूल होइनासा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या