
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री रस्त्यावर दुपारी भरधाव वेगात असलेल्या दुचाकीला अचानक आग लागली. या दुर्घटनेत दुचाकी जळुन खाक झाली. तर दुचाकीस्वारांनी प्रसंगावधानता राखुन उडी मारल्याने कुठलीही इजा झाली नाही. ही घटना आज 5 मे रोजी दुपारी घडली.
अंबड तालुक्यातील गोंदी येथून वडीगोद्रीकडे टरबूज विकण्यासाठी जाणारे विलास बाबुराव पंचलोटे हे आपल्या प्लॅटिना गाडीने जात असताना त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. ही बाब विलासच्या लक्षात येताच त्यांनी उडी मारली त्यामुळे सुदैवाने ते बचावले. मात्र गाडीने जास्तीचा पेट घेतल्याने स्फोट होवून दुचाकी जळून खाक झाली आहे. उडी मारल्यामुळे विलास पंचलोटे हे या घटनेतून बचावले आहे. सुदैवाने त्यांना कुठलीही जीवितहानी झाली नाही. गाडीने अचानक कशामुळे पेट घेतला याचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु विलास पंचलोटे यांच्या सांगण्यावरून गाडी सकाळपासून उन्हामध्ये उभी होती व गाडीमध्ये 5 ते 6 लिटर पेट्रोल होते. उन्हामध्ये गाडी उभी असल्याने ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 5 ते 6 अंबड तालुक्यातील गोंदी येथून वडीगोद्रीकडे टरबूज विकण्यासाठी जाणारे विलास बाबुराव पंचलोटे हे आपले वाहन क्र. (एम. एच. 21 – 9859) प्लॅटिना गाडीने जात असतांना वडीगोद्री शिवारात मोटार सायकलने अचानक पेट घेतला.




























































