जालन्यात काटे टाकून गाव बंदी

931

जालना शहरात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांनी खबरदारी म्हणून गावागावात बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना गाव बंदी घातली आहे. मुख्य रस्त्यावर काटे व झाडाच्या फाद्या टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यातील पिपंळगाव थेटे येथील गावकर्‍यांनी प्रत्येक गल्लीत प्रवेश स्थळी बाभळी काटे, लोखंडी पत्रे, गेट लावून बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या