जळगावात जिल्ह्यात आणखी एक कोरोनाग्रस्त आढळला, रूग्णांची संख्या 6 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील एका 73 वर्षीय वृद्धाला  कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाला आज 23 एप्रिल रोजी प्राप्त झाला आहे. त्यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आले आहेत. त्यापैकी एक जण कोरोना मुक्त होऊन घरी गेला आहे.  तर दोन कोरोना ग्रस्तांच्या मृत्यू झाला असून तिघांवर जळगावच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या  सहा रुग्णांमध्ये जळगाव शहराच्या मेहरून व सालारनगर मधील प्रत्येकी एक तसेच अमळनेर शहर व तालुक्यातील चार रुग्ण आहेत. अमळनेरात प्रशासनाकडून जमाबंदी व संचार बंदीच्या अंमलबजावणीची कडक अंमलबजावणी केली जात आहे.