
जळगाव जिल्ह्याच्या पारोळा येथील शेळावे येथे सरपंचाकडून आदिवासी महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन चार दिवसांपूर्वी शेळावे ग्रामपंचायत येथे मासिक बैठक होती. या बैठकीत आदिवासी महिलेने सरपंच यांना कामकाजा बाबत जाब विचारला म्हणून सरपंच यांनी आदिवासी महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती.
जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर या महिलेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष संघटक, तथा आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश भाऊ साळुंके यांच्याशी संपर्क साधला. तसेच महिलेने घडलेल्या प्रकारची माहिती त्यांना देत पारोळा पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ असल्याचं त्यांना सांगितलं.
महिलेला न्याय मिळावा म्हणून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुढाकार घेत याविरोधात आवाज उचलला आणि आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच मुकेश साळुंके यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. शिवसेनेची मागणी लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी तात्काळ या घटनेची दखल घेत आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. याचसोबत आज स्थानिक डीवायएसपी यांनी शेळावे येथील आदिवासी कुटुंबाची भेट घेऊन पंचनामा केला आणि आरोपींवर कठोरात कठोर होईल, असे आश्वासन दिले.