‘जळगावात भाजपनं गुलाब पाहिला, पण आता सैनिकांचे काटे बघायचे’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर भेट घेण्यासाठी आलेल्या जळगाव आणि वाशिममधील कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला टोला लगावत, इशाराही दिला. यावेळी जळगावातील गुलाबराव वाघ यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

‘प्रेमाने, मायेने निष्ठेचं दूध पाजलं पण अवलाद गद्दाराची गद्दारच निघाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. आतापर्यंत भाजपनं जळगावात गुलाब पाहिला आता सैनिकांचे काटे बघायचे आहेत’, असा सणसणीत टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. एक गुलाबराव भाजपमध्ये गेल्यानंतर आता दुसरा गुलाबराव शिवसेनेत आल्याचं त्यांनी जाहीर केलं.