खूनाच्या आरोपातून दोघांची निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। जळकोट

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, उदगीर येथील न्यायाधीश ए. व्ही. गुजराथी यांनी आरोपी काशीराम ऊर्फ दत्ता केशव केंद्रे आणि सुलोचना ऊर्फ सरस्वती शंकर केंद्रे या दोघांची खूनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.

गणेश केंद्रे यांनी आरोपी सुलोचना हीने अनैतिक संबंधातून त्यांचा मुलगा शंकर केंद्रे याचा खून केल्याचा आरोप केला होता. तशी फिर्याद त्यांनी पोलीस ठाणे, जळकोट येथे दिली होती. त्या फिर्यादीवरुन गु. र. नं. 72 /2011 कलम 302 भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर प्रकरणात मे. न्यायालयाने एकूण 11 साक्षीदार तपासले. पण पुराव्या अभावी न्यायालयाने आरोपी काशीराम आणि सुलोचना यांची खूनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपी पक्षाकडून अॅड. एस. व्ही. गवळे जळकोटकर यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. एच. एस. बलांडे, अॅड. अमोल गिलचे, अॅड. लक्ष्मण सोमवंशी यांनी सहाय्य केले.