रुग्णवाहिका दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

597
accident

रुग्णवाहिका व दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान जालना जिल्ह्यातील संभाजीनगर -बीड राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगाव फाट्यावर घडली.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सौंदलगाव येथील देविदास रामदास खोमणे (45) आपल्या गावावरुन वडीगोद्री गावाकडे दुचाकी क्र. (एम एच 21 ए क्यु.7931) वरून जात असताना पाठीमागुन संभाजीनगरहुन बिडकडे प्रेत घेवुन जाणारी अँब्युलन्स क्र.( एम एच 16 डी एल 0072) ने जोराची धडक दिल्याने देविदास खोमणे गंभारीत्या जख्मी झाल्याने वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु ते रस्त्याने मरण पावले. प्राथमिक आरोग्य केंद्रात श्वविच्छेदन करण्यात येऊन रुग्णवाहिका चालकाला ग्रामस्थांनी गोंदी पोलिस ठाण्याच्या स्वाधीन केले.

आपली प्रतिक्रिया द्या