विकासात अडवणूक करणाऱ्यांना धडा शिकवा- राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर

401

काँग्रेसच्या फसव्या राज्यकर्त्यांनी खोटी स्वप्ने दाखवुन जाती -जाती व धर्मा-धर्मात भांडणे लावली. सत्तेच्या चाली खेळल्या. मागास,वंचित घटकांसह जालना शहरास विकासाच्या बाबतीत अंधारात लोटले. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शहरात चौफेर विकास दिसू लागला. केंद्राकडून 12 कोटींचा निधी आणून पथदिवे सुरू करत काँग्रेस राजवटीत अंधारात गेलेल्या शहरास आम्ही विकासाची पहाट दाखवली. तसेच विकासात अडवणूक करणाऱ्यांना धडा शिकवा असे आवाहनही राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.

जालना विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रचारार्थ रामनगर भागातील धनतृप हनुमान मंदिर परिसरात मंगळवारी तुफान गर्दीची रेकॉर्डब्रेक अशी जाहीर सभा घेण्यात आली.

यावेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर बोलत होते. उद्योजक आबासाहेब, ताकवाले, रावसाहेब राऊत, सविताताई किवंडे, भाऊसाहेब घुगे,आत्मानंद भक्त, महेश दुसाने, सकुबाई पणबिसरे,वर्षा ठाकूर, सुनिता कुलथे, भोला कांबळे, सुशील भावसार,लखन कणिसे, मुसा परसुवाले,दिनेश भगत, दुर्गेश काठोठीवाले, नरेश खुदभैय्ये, राजू दुसाने, दीपक हवाले आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना खोतकर म्हणाले की, गेल्या पाच वर्षात जालना शहरातील रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी उपलब्ध झाला असून लोखंडी पूल नव्याने तयार करण्यासाठी देखील निधी आला आहे .असे सांगून, राज्यमंत्री खोतकर म्हणाले,आपल्या आमदार फंडातून कानडी वस्तीत सभागृह मंजूर केले. मात्र नगरपालिकेने अडवणूक करून एन .ओ. सी. दिली नाही. त्यामुळे विकासात अडवणूक करणाऱ्यांना धडा शिकवून आपल्याला समर्थन द्या, असे आवाहन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या