
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरे येथील शेतकरी अशोक ठोंबरे यांनी बँकेच्या कर्जाच्या तगाद्याला कंटाळून आपल्या शेतातील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 3 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता घडली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चांदई ठोंबरे येथील शेतकरी अशोक नाना ठोंबरे (40) यांच्याकडे एचडीएफसी बँकेचे 5 लाख रुपये कर्ज थकीत होते.
या कर्जाची मागणी बॅकेच्या वतीने वारंवार होत असल्याने व बँकेचे कर्ज फेडू न शकल्याने शेतकरी अशोक ठोंबरे यांनी त्यांच्या स्वतःचे शेतात शेत गट क्रमांक 148, बांधावरील बोरीच्या झाडाला गळफास घेऊन 3 जानेवारी रोजी पहाटे आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळाताच सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल गणेश मांटे, संतोष वाडेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






















































