
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील गोपी शिवारातील कांद्याच्या शेतात तस्करी करण्याच्या उद्देशाने अफुच्या लागवड केली होती. याची माहिती जाफराबाद पोलीसांना मिळताच त्यांनी छापा मारुन 11 लाख रुपये किंमतीचे अफुचे झाडे व शेत मालक गजानन डुकरे यांच्यासह तीन यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई आज 1 मार्च रोजी करण्यात आली. जालना जिल्ह्यातील जाफराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपी शिवारात एका शेतातील कांद्याच्या पिकात अफूच्या झाडाची तस्करी करण्याचे उद्देशाने लागवड करून संगोपन केले आहे, अशी माहिती पोलीसांना मिळाली. यावरुन कार्यवाहीसाठी लागणारे सर्व नियम पाळून स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी इंदल बहुरे व जाफराबाद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोरे यांनी पथक तयार करून कृषी विभाग, शासकीय पंच, महसूल विभागचे अधिकारी यांच्यासह गोपी शिवारातील गजानन देऊबा डुकरे यांच्या शेतात छापा मारला असता तेथील एका कांद्याची शेतात 40 किलो अफूची झाडे लागवड केलेली दिसली त्यावरून सर्व अफूची झाडे ताब्यात घेऊन रितसर पंचनामा करून 11 लाख रुपये किमतीचे सर्व झाडे जप्त केली. याप्रकरणी गजानन देऊबा डुकरे यांच्यासह तेथे उपस्थित असलेले राहुल विलास बारगळ, कृष्णा गजानन गावंडे, भरत शिवाजी लोखंडे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमूख व अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्वतः पोलीस उपविभागीय अधिकारी इंदलसिंग बहुरे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे, पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, सहाय्यक फौजदार आसेफ शेख, पोना राजु डोईफोडे, पोना सुभाष जायभाये, पोना रामेश्वर सिनकर, पोना नरहरी खार्डे, पोलीस अंमलदार सचिन तिडके, गणेश पायघन, योगेश पाटीलपाईक, शाबान तडवी, निलेश फुसे, चालक लक्ष्मण वाघ, कृषी विभागाचे विजय गायकवाड यांनी केली आहे.


























































