जालना – जिजामाता कॉलनीत आगीचे तांडव, चार लाखांचे नुकसान

259

जिजामाता कॉलनीतील रहिवाशी संजय रामकिसन एखंडे यांच्या निवासस्थानी गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

एखंडे कुटुंबीय झोपेतच असतांना लागलेल्या या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटनेच ही लागली असावी असा कयास आहे. आग लागल्याचे कळताच संजय एखंडे यांनी अग्नीशामक दलास पाचारण केल्यानंतर अग्नीशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणल्याचे  संजय एखंडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या