मोटरसायकलचा समोरा-समोर अपघात, एक ठार तर दोन जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सुरंगली फाटाजवळील देहेड शिवारात आज 10 वाजता झालेल्या मोटार सायकलच्या सुमारा-समोरा धडकेत एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात बालाजी समाधान बावस्कर हा उपचारासाठी संभाजीनगर येथे नेत असतांनाच रस्त्यातच मृत्यू पावला.

देहेड येथील बालाजी समाधान बावस्कर (30) हे भोकरदन येथील औटी पेट्रोलपंपवर कामावर असून ते घरी येत असताना सुरंगली फाटा जवळील देहेड शिवारात आज 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास समोरून मोटरसायकलवर येत असलेले सुधाकर दळवी व माणिक दळवी रा. मनापुर ता. भोकरदन यांची मोटरसायकल समोरासमोर धडक झाली. धडक होऊन बालाजी समाधान बावस्कर उपचारासाठी संभाजीनगरला हलवण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा अंत झाला. दुसऱ्या दुचाकीवील माणिक दळवी व सुधाकर दळवी यांच्यावर संभाजीनगर येथील सरकारी दवाखान्यात उपचार चालू आहे. बालाजी बावस्कर यांना एक मुलगा व मुलगी ३ वर्षाची असून आई -वडील व भाऊ असा परिवार आहे. दरम्यान ही घटना घडल्याने देहेडसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.