जालना जिल्ह्यातील पारध ग्रामपंचायतींवर पुन्हा शिवसेनेचा भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध ग्राम पंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला असून भाजप व राष्ट्रवादी युतीचा पराभव झाला आहे.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांच्या ग्रामविकास पॅनलने 15 पैकी 12 जागा जिंकल्या असून भाजपला 2 तर राष्ट्रवादीला 1 जागेवर समाधान मानावे लागले. गेली 15 दिवसापासून ग्रामपंचायत निवडणूक गावात पूर्णपणे वातावरण तापले होते.

भाजपाचे माजी सभापती परमेश्वर लोखंडे व राष्ट्रवादीचे संग्रामराजे देशमुख यांनी आघाडी करून मनीष श्रीवास्तव ग्रामविकास पॅनलला एकाएकी पाडण्यासाठी जिवापार प्रयत्न केले. परंतु शिवसेनेने मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर आज लागलेल्या निकालातून दाखवून दिले व विजय मिळविला.

या विजयात शिवसेनेचे शेखर श्रीवास्तव, परमेश्वर आल्हाट, अक्षय तेलंग्रे, गणेश लोखंडे, समिखा पठाण, वर्षा जाधव, सुरेखा डोईफोडे, मंगला लोखंडे, शारदा काकफळे, परविन शेख शकील, शहेदापरविन समिउल्लाखा पठाण, कमलबाई सुरडकर हे विजयी भाजपला 2 तर राष्ट्रवादीला 1 जागेवर समाधान मानावे लागले.

संपूर्ण गावात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात भगवे वातावरण निर्माण झाले असून या विजयासाठी शिवसेनेचे मनीष श्रीवास्तव, शिवाजी पाटील, सखाराम पा.लोखंडे, गजानन लोखंडे, रविद्र आल्हाट, बबन लोखंडे, शेख.आबेद, शेख युनुस, सुखदेव भुते, समाधान लोखंडे, राजु लोखंडे, शिवा तेलंग्रे, विनोद तेलंग्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.