
जालना जिल्ह्यातील जाफाबाद तालुक्यातील हनुमंत खेडा येथील अवैध वाळु माफियाच्या मुक्या आवळल्या असून पुर्णा – धामण नदीच्या पात्रातील वाळू चोरांना टेंभुर्णी पोलीसांनी धडाकेबाज कार्यवाहीने धसका दिला.
शुक्रवारी 3 एप्रिल रोजी रात्री एक वाजता हनुमंतखेड ब्रह्म पुरी येथील पूर्णा नदीमधून हायवा मध्ये अवैध वाळू उपसा करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन याना मिळाली होती. त्यानुसार छापा कारवाई करून हनुमंत खेडा येथे एक टाटा हायवा अवैध गौण खनिज वाळू चे उत्खनन करत असताना मिळून आले असून टेभुर्णी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी विजय शेवत्रे व इतर 1 आरोपीवर गुन्हे नोंद केले आहे. आरोपीच्या ताब्यातून 24 लक्ष 12 हजार किमतीचे ट्रॅक व वाळू जप्त करण्यात आली आहे.
































































