सात दिवसांत जगातील 7 आश्चर्यांना भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात अनेक लोक आहेत, जे काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करीत असतात. अनेकदा याच छंदातून ते अचाट कामगिरी करतात आणि त्यांची कामगिरी एक विक्रम ठरते. असाच एका अवलिया जॅमी मॅकडोनल्ड याने जगातील सात आश्चर्ये केवळ सात दिवसांत पाहिली. अशक्य वाटणाऱया त्याच्या या कामगिरीमुळे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ने त्याला सन्मानित करण्यात आले. ‘ऍडव्हेंचर मॅन’ म्हणून ओळखले जाणारे इंग्लंडमधील जॅमी मॅकडोनल्ड यांनी जगातील सात आश्चर्ये केवळ सात दिवसांत पाहण्याचा निश्चय केला आणि त्यानुसार त्यांनी आपली मोहीम सुरू केली. त्यांनी ‘ग्रेट कॉल ऑफ चायना’, ‘ताजमहाल’, ‘पेट्रा’, ‘दि कोलेसम’, ‘क्राईस्ट द रेडिमर’, ‘माचू-पिचू’, ‘चिचेन इत्झा एल कॅस्टिलो’ या सात ठिकाणांना फक्त सहा दिकस 16 तास 14 मिनिटांत भेट देत आपली मोहीम फत्ते केली. सुपरहीरो फाऊंडेशन या चॅरिटीसाठी पैसा उभा करण्यासाठी त्यांनी ही मोहीम केली.