जामखेड नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयास ठोकले सील

491

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने नगरपरिषदेचा 17 लाख रुपयांचा कर थकवल्याने मंगळवारी दुपारी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयास कुलुप ठोकून सील केले. या कारवाईमुळे बाजार समितीचे चांगलेच धाबे दणाणले आहेत..

जामखेड शहरात नगरपरिषद प्रशासनाची कर वसुली जोरात चालू आहे. थकितांना लेखी कळवूनही वेळेत दखल न घेतल्याने नगरपरिषदेने सक्तीची वसुली चालू केली आहे. नगरपरिषद झाल्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीवर ही पहीलीच कारवाई करण्यात आली आहे. जामखेड च्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नगर परिषदेची तीन वर्षापासूनची दंडासह 17 लाख 35 हजार 494 रुपये एवढी थकबाकी आहे. या बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यास तयार होती मात्र नगरपरिषदे कडुन सर्व रक्कम भरावी असे सांगण्यात आले होते. ही रक्कम भरण्यास बाजार समितीने टाळाटाळ केली. त्यामुळे जामखेड नगरपरिषदेने तीन वेळा जप्तीची नोटीस पाठवली होती. मात्र तरी देखील बाजार समितीने रक्कम भरली नाही. त्यामुळे आखेर नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवार दि 3 रोजी दुपारी चार वाजता सचिव व सभापती कार्यालया सह संपुर्ण कार्यालयास कर थकवल्या प्रकरणी कुलुप ठोकून सील ठोकले. त्यामुळे बाजार समितीच्या कार्यालयालयातील सर्व कर्मचार्‍यांना अर्धवट कामकाज सोडुन बाहेर पडावे लागले. त्या मुळे नगरपरिषद व बाजार समितीचा तोडगा जो पर्यंत सुटत नाही तो पर्यंत याचा आर्थिक परीणाम बाजार समितीवर होणार आहे.

या बाबत बाजार समितीचे सचिव लक्ष्मण कांबळे यांनी या कारवाई वर प्रतिक्रीया व्यक्त करताना सांगितले की बाजार समितीच्या आवारात नगरपरिषद कसल्याही सुविधा उपलब्ध करून देत नाही. तसेच साफसफाई कामगार नाहीत, लाईट व गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची सुविधा मिळाली नाही त्यामुळे पाणीपट्टी सह एवढा कर आम्ही कसा भरायचा? तसेच जो आम्हाला व्याजासह दंड आकराला आहे तो अकारु नये जी रीतसर कराची रक्कम आसेल ती आम्ही भरण्यास तयार आहोत. मात्र आज बाजार समितीची आर्थिक परीस्थिती बिकट आसल्याने पुर्ण रक्कम भरु शकत नाही त्यामुळे दोन लाख रुपयांचा धनादेश उपसभापती शारदा शदर भोरे यांच्याशी चर्चा करून देण्यास तयार होतो तरी देखील ही रक्कम घेण्यास नगरपरिषदेने नकार दिला व आम्हाला नोटीस न देताच कार्यालय सील केले. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून पाणी, सफाई कामगार व वीजेची मागणी करूनही आम्हाला या सेवा मिळत नाहीत कर मात्र भरमसाठ आकारला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या