जामखेड शहर 10 मेपर्यंत हॉटस्पॉट जाहीर

859

नगर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण जामखेड शहरात आढळल्याने गेल्या एक महिन्यापासून जिल्हाधिकाऱ्यांनी जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून 6 मेपर्यंत जाहीर केले होते. त्याची मुदत आणखी चार दिवस वाढवून 10 मेपर्यंत हॉटस्पॉट केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जामखेड शहरात आतापर्यंत 17 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे मागील महिन्यातील 10 एप्रिलपासून संपूर्ण जामखेड शहर दोन किलो मीटर अंतरापर्यंत हॉटस्पॉट घोषित केले होते. सुरुवातीला चार दिवसांसाठी जाहीर केले होते, पुन्हा 14 तारखेला हॉटस्पॉट मुदत वाढवून पुढील दहा दिवस वाढवले.

18 एप्रिल रोजी शहरातील एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. मृत व्यक्तीच्या संपर्कातील दोन मुलांसह एकूण 10 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलत जिल्हाधिकाऱ्यांनी 19 एप्रिलला आदेश काढून 1 मेपर्यंत हॉटस्पॉट जाहीर केले होते. पुन्हा आदेश काढून 6 मेपर्यंत हॉटस्पॉट जाहीर केले होते. आता पुन्हा आदेश काढून 10 मेपर्यंत हॉटस्पॉट जाहीर केला आहे. महिन्याभरापासून लोकांना हॉटस्पॉटमुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रशासन सर्व अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यातही अनेक अडचणी येत आहेत. लोकांना योग्य ती सेवा मिळत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या