
जम्मू विमानतळावर रात्री दोनच्या सुमारास एक स्फोट झाला. हा स्फोट तांत्रिक विभागात झाला असून कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळता जम्मू कश्मीर पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे. तसेच या स्फोटाचा तपास करण्यासाठे फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.
Jammu and Kashmir: Explosion heard inside Jammu airport’s technical area; forensic team reaches the spot
Details awaited pic.twitter.com/duWctZvCNx
— ANI (@ANI) June 27, 2021
मिळालेल्या माहितीनुसार जम्मू विमातनळात तांत्रिक विभागात स्फोट झाला. हा विभाग सैन्याच्या नियंत्रणाखाली आहे. स्फोटच्या आवाजामुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. हा दहशतवादी हल्ला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. घटनेची माहिती मिळताच जम्मू कश्मीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. असे असले तरी हा स्फोट किती भीषण होता हे अद्याप कळालेली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे आणि स्फोट कशामुळे झाला याचा शोध घेत आहे.




























































