जम्मू-कश्मीरात तीन वर्षांत 400 दहशतवाद्यांची घुसखोरी

29

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या तीन वर्षांत जम्मू– कश्मीरमध्ये जवळपास 400 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली होती. त्यापैकी किमान 126 दहशतवाद्यांना हिंदुस्थानी जवानांनी ठार केल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ते म्हणाले की, घुसखोरांशी झालेल्या चकमकीत 27 सुरक्षारक्षक शहीद झाले असून चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात जवानांना यश आले आहे. जम्मू-कश्मीरच्या सर्वच सीमारेषांवरून दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले असल्याचे सांगून रेड्डी म्हणाले की, या घुसखोरीमुळेच कश्मीरमध्ये अशांतता माजली आहे. 2016 मध्ये घुसखोरीच्या 119 घटना घडल्या असून 2017 मध्ये 136 आणि 2018 मध्ये 143 वेळा घुसखोरी झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या