कश्मीरमध्ये प्रवासी गाडी दरीत कोसळून 16 ठार

454

जम्मू-कश्मीरच्या डोडा जिल्हय़ात प्रवासी गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 16 जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे. मारमत भागात दुपारी साडेतीन वाजता हा अपघात घडला. एका वळणावर गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर ती 700 फूट दरीत कोसळली. यात 12 जण जागीच ठार झाले तर चार जण उपचारादरम्यान दगावले. गंभीर जखमीला जम्मूच्या सरकारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

आपली प्रतिक्रिया द्या