कश्मीर खोऱ्यात पीडीपी नेत्याच्या घरावर हल्ला; खासगी रक्षक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पीडीपी नेत्याच्या घरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडीपी नेत्याच्या खासगी सुरक्षा रक्षकाचा(पीएसओ) गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

दरम्यान, हल्लेखोर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून शोधमोहीम राबवली जात आहे. मध्य काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील नाटीपोरा भागात सोमवारी सकाळी दहशतवाद्यांनी पीडीपी नेता हाजी परवेज अहमद यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा खासगी सुरक्षा रक्षक मंजूर अहमद गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले असता, तिथे त्याचा मृत्यू झाला. पीडीपी नेता परवेज यांनी सांगितले की, माझी मुले, वृद्ध आई आणि अन्य कुटुंबीय घरात होते. तेक्हा सकाळी तोंड बांधलेले दोन हल्लेखोर मुख्य दरवाज्यातून आत आले व त्यांनी पोलीस कर्मचाऱयांवर गोळीबार सुरू केला. यानंतर माझ्या पीएसओकडूनदेखील गोळीबार सुरू करण्यात आल्यावर हल्लेखोरांनी पळ काढला.