जम्मू-कश्मीरमध्ये हिमस्खलन; तीन जवान शहीद, एक बेपत्ता

481

कश्मीरच्या उत्तर भागात गेल्या 48 तासांपासून हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे हिमस्खलन होऊन हिंदुस्थानी सैन्याचे तीन जवान शहीद झाले आहेत. माछिल सेक्टरमधील सैन्याच्या एका चौकीजवळ हे हिमस्खलन झालं आहे. यात तीन जवान शहीद झाले असून चौथा जवान बेपत्ता झाला आहे. याखेरीज या स्खलनामुळे बर्फात दबलेल्या एका जवानाला वाचवण्यात यश आलं आहे.

बेपत्ता जवानाच्या शोधासाठी मोहीम राबवण्यात आली आहे. माछिल क्षेत्रात हिमवादळ आलं होतं. त्याच्या तडाख्यात सापडल्याने हे जवान शहीद झाले. दरम्यान, नौगाम सेक्टरमध्येही सीमा सुरक्षा दलाचे चार जवान हिमवादळाच्या तडाख्यात सापडले होते. त्यातील तीन जणांना वाचवण्यात यश आलं तर एक जवान शहीद झाला आहे. बांदीपोरा क्षेत्रातही सोमवारी हिमस्खलन होऊन काही घरांचे नुकसान झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या