कुटुंबाचा भार हलका करण्यासाठी हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग! 21 वर्षीय बंजीत कौरचे होतेय कौतुक

गतवर्षी लॉकडाऊनमुळे अनेकांनी नोकऱया गमावल्या, हातावर पोट असलेल्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली. तरीही आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देत अनेकांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अशक्यप्राय काटणाऱया गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. अशीच घटना जम्मू-कश्मीरमध्ये घडली आहे. लॉकडाऊनमध्ये वडिलांनी नोकरी गमावल्यामुळे कुटुंबाचा भार हलका करण्यासाठी चक्क 21 वर्षीय बंजीत कौर या मुलीने जगाची पर्का न करता हाती रिक्षाचे स्टेअरिंग घेतले आहे. सध्या बंजीतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्सने तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

बंजीत ही जम्मू कश्मीरच्या उधमपूर जिह्यातील रहिवासी आहे. तिचे वडील गोरख सिंग एका स्कूल बसवर ड्रायव्हृर म्हणून काम करत होते. मात्र लॉकडाऊनमध्ये शाळा, कॉलेज बंद असल्याने त्यांची नोकरी गेली. कुटुंबाच्या उदरनिर्काहासाठी गोरख सिंग यांनी रिक्षा चालकण्याचा पर्याय निवडला. मात्र त्यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे होते. त्यामुळे वडिलांच्या मदतीसाठी बंजीतने पुढाकार घेतला. वडिलांसोबत आता तीदेखील रिक्षा चालकते. याबाबत ती म्हणाली, ’कॉलेजच्या अभ्यासासोबत पार्टटाइम जॉबप्रमाणे मी आता रिक्षा चालवतेय. यामुळे वडिलांच्याही कामात हातभार लागत आहे. मुलींनी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असले पाहिजे.’ याबाबत कडील गोरख सिंग म्हणाले, ’माझ्या मुलीने बापाच्या डोक्यावरचे ओझे हलके केले आहे. मला तिचा अभिमान वाटतो.’

आपली प्रतिक्रिया द्या