
जान्हवी कुकरेजाच्या हत्या प्रकरणात फॉरेन्सिक लॅबचा अहवाल दोन गोष्टीचा उलगडा करणार आहे. अटक तरुणाला नेमकी इजा कशामुळे झाली, घटनास्थळी सापडलेले नेमके रक्त कोणाचे आहे हे फॉरेन्सिक अहवालावरून स्पष्ट होणार असून खार पोलीस लवकरच घटनेचा क्राईम सीन करणार आहेत.
जान्हवीच्या हत्येप्रकरणी खार पोलीस तपास करत असून पोलिसांनी आतापर्यंत 22 जणांच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. त्या रात्री पार्टीनंतर नेमके काय झाले हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना त्या इमारतीच्या काही माळ्यांवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. ते रक्ताचे डाग नेमके कोणाचे आहेत तर अटकेत असलेल्या तरुणाला नेमकी इजा कशी झाली, हे फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. खार पोलिसांनी अटकेत असलेल्या तरुणीची चौकशी केली असून ती त्या घटनेची वेगवेगळी माहिती सांगत असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.
हत्येअगोदर केला जान्हवीने मित्राला फोन
पार्टीदरम्यान जान्हवीने तिच्या एका मित्राला फोन केला होता. फोन केलेल्या त्या जान्हवीच्या मित्राची ओळख पटली असून त्याच्या चौकशीनंतर तिने फोन करून नेमके त्याला काय सांगितले हे स्पष्ट होईल



























































