हस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले

जपानमधील एक 51 वर्षांच्या व्यक्तीला अचानक डोकेदुखी, उलट्या आणि मळमळणे असा त्रास सुरू झाला. अस्वस्थ वाटत असल्याने त्याने रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी त्याची लक्षणे लक्षात घेत त्याच्या मेंदूचा सीटीस्कॅन केला. त्यात मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्याला अर्धांगवायूचा झटका आल्याचे निदान करण्यात आले. त्याला हा झटका ज्या कारणामुळे आला ते कळाल्यानंतर डॉक्टरही चक्रावले आहेत.

जपानमधील 51 वर्षांचा माणूस लैंगिक समाधानासाठी दिवसातून अनेकदा हस्तमैथुन करत होता. त्याची ही सवयच त्याच्या जीवावर बेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हस्तमैथुन केल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. डोकेदुखी, मळमळणे अशी लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्याने रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या तपासण्या केल्यावर आणि त्याच्या दिनचर्येबाबत माहिती घेतल्यावर त्याला आलेल्या अर्धांगवायू्च्या धक्क्याचे कारण स्पष्ट झाले, असे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या या अतिप्रमाणात हस्तमैथुनाच्या सवयीमुळे तो मृत्यूच्या दारात पोहचला होता. मात्र, सुदैवाने त्याला बचावण्यात यश आले आहे. त्याच्यावर दोन आठवडे उपचार करुन त्याला घरी पाठवण्यात आल्याचे नागोया महाविद्यालय रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

डेली मेलने याबाबतचे वृत्त दिले आहे. अतिश्रमाची कामे केल्यानंतर किंवा मनावर दडपण आल्यावर तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांना अर्धांगवायूचा धक्का येण्याची जास्त शक्यता असते. या व्यक्तीची तपासणी केल्यावर त्याचा रक्तदाब खूप कमी झाला होता. त्यामुळे त्याला मृत्यूचा धोका होता. त्यामुळे त्याच्या लक्षणांचे निदान केल्यावर अतिप्रमाणात हस्तमैथुन करण्याची सवय त्याच्या जिवावर बेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लैंगिक समाधानासाठी दिवसातून अनेकदा हस्तमैथुन केल्याने त्याच्या मेंदूवर दडपण येत होते. तसेच त्याचा रक्तदाबही कमी होत होता. मात्र, ही लक्षणे त्याला जाणवली नाहीत. अचानक डोकेदुखी आणि उलट्या सुरू झाल्याने रुग्णालयात आल्यावर तपासणीनंतर त्याला कशामुळे त्रास होत याचे निदान झाले. अनेकदा संभोगादरम्यान स्ट्रोकचा धक्का येण्याच्या काही घटना याआधीही घडल्या आहेत. मात्र, हस्तमैथुनामुळे असा धक्का येण्याची ही पहिलीच घटना आपण पाहत असल्याचे डॉ. मसाहिरो ओमुरा यांनी सांगितले.

संभोगशक्ती वाढवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या व्हियाग्रासारखी औषधे किंवा अंमली पदार्थांमुळेही झटका येण्याचा धोका वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. 2017 मध्ये मैत्रिणीशी लैंगिक संबंध ठेवताना तैवानमधील एका 22 वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा स्ट्रोकमुळे मृत्यू झाला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. 51 वर्षांच्या व्यक्तीवर दोन आठवडे उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. तसेच त्याचे समुपदेशन करून त्याला योग्य ते मार्गदर्शन करण्यात आल्याचे डॉ.ओमुरा यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या