
काही दिवसांपूर्वी जपानच्या आकाशात अनोखी आतषबाजी बघायला मिळाली. आकाशातून छोटे-छोटे गोळे धरतीवर कोसळू लागले. या अनोख्या नजाऱयाचे फोटो आणि व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहेत. हे आगीचे गोळे म्हणजे उल्कापात होता, असं आता स्पष्ट झालं आहे.
जपानच्या दक्षिणेला एईची, मी आणि अन्य प्रांतातील आकाशात अग्निगोळे आढळून आले. उल्कापिंड जसजसा पृथ्वीजवळ आला तसा तो चंद्रासारखा चमकू लागला. त्याचे काही तुकडे जमिनीवर पडताना दिसले. नेमकी ही घटना काय आहे, याचा लोकांना अंदाज आला नाही. अचानक प्रकाश आल्याने रात्रीचा दिवस कसा झाला हे लोकांना समजेना. काहींना तर स्पह्ट झाल्यासारखे वाटले.


























































