
बॉलिवूडच्या गाण्यांची क्रेझ हिंदुस्थानातच नाही तर जगभरात आहे. याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमधून येतोय.
सध्या दोन जपानी मुलींचा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. त्यात त्या दोघी ‘रईस’ या चित्रपटातील ‘उडी उडी जाए’ या गाण्यावर हिंदुस्थानी पद्धतीने गरबा स्टेप्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहे. अयाका आणि ची अशी या मुलींची नावे असून त्या टोकियोमध्ये फिटनेस स्कूल चालवतात. आपल्या यू-टय़ूब चॅनेलवर त्या बॉलिवूडच्या लोकप्रिय गाण्यांकर डान्स करून व्हिडिओ शेअर करत असतात.



























































