
सामना ऑनलाईन । मंगळूर
फुलांची शेती ही शेतकर्याचे उत्पन्नाचे स्रोत असतं. परंतु हीच फुले आता शाळेच्याही उत्पन्नाचे स्रोत झाले आहे. त्यामुळे शाळेचा आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली आहे. कर्नाटकातील मंगळूरमधील एका शाळेने जाईच्या फुलांपासून भरघोस उत्पन्न घेऊन शिक्षकांच्या वेतनाच प्रश्न मिटवला आहे.
मंगळूरमधील 40 किलोमीटर असणाऱ्या ओजाला गावाती सरकारी शाळेच्या प्रशासाने आपल्या आवारत जाईची फुले लावून व विकून ती शिक्षकांचे वेतन दिले आहे.
शाळेने 8 वर्षापूर्वी कंत्राटी पद्धतीवर दोन शिक्षकांची भरती केली होती. परंतु या शिक्षकांना वेतन देण्याइतपत शाळेकडे पैसे नव्हते. यासाठी प्रशासनाने शाळेच्या दीड एकर जमिनीत जाईची फुले लावली. सुरूवातीला प्रशासनाने २५ झाडे लावली. दोन वर्षानंतर या झाडांमध्ये १० झाडे अजून लावली. या झाडांना चांगली फुले आणि बहरली.
या झाडावरील फुलांपासून शाळेला वर्षाखाठी ७० ते ८० हजार रुपये मिळतात. या उत्पनातून शाळेचा दोन्ही शिक्षकांच्या उत्पन्नाचा प्रश्न सुटला. रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेत शाळेसाठी स्मार्ट वर्ग, शौचालय आणि बोअरवेलची सोय करून दिली आहे.
सदर फुलांची निगा शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही मिळून करतात. ही फुले काढून शाळेपासून चार की.मी दूरवर बाजारात विकली जातात. लग्नसराई आणि सण उत्सवाच्या काळात या फुलांना मोठी मागणी असते.






























































