
चीनमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेत मराठमोळा ऋतुराज गायकवाड हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याआधी, टीम इंडिया याच महिन्यात आयर्लंड दौऱयावर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र या दौऱयासाठी ऋतुराजऐवजी जसप्रीत बुमराहकडे हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. ‘बीसीसीआय’च्या संघनिवड समितीच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ऋतुराजच्या नेतृत्वाची रंगीत तालीम हुकणार
आशियाई क्रीडा स्पर्धेत ऋतुराज गायकवाड ‘टीम इंडिया’चे नेतृत्व करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयर्लंड दौऱयावरही ऋतुराजकडेच ‘टीम इंडिया’ची धुरा सोपविली असती तर त्याच्या कर्णधारपदाची रंगीत तालीम झाली असती. मात्र, दुखापतीमुळे वर्षभर क्रिकेटपासून दूर असलेल्या जसप्रीत बुमराहला आयर्लंड दौऱयासाठी कर्णधार बनविण्यात आले आहे, तर ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. आयर्लंड मालिकेनंतर लगेचच ‘टीम इंडिया’ आशियाई स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे आणि त्यावेळी गायकवाड ‘टीम इंडिया’चे नेतृत्व करणार आहे. अशा परिस्थितीत ऋतुराजला आयर्लंड दौऱयापूर्वी कर्णधारपदाचा अनुभव घेण्याची चांगली संधी होती,



























































