‘माझ्या मदतीने पीएम झाला, अन विश्वासघात केला; अद्दल घडवणारच’, जावेद मियांदाद-इम्रान खान भिडले

3120

एकेकाळी पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून एकत्र खेळलेले जावेद मियांदाद आणि इम्रान खान यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला आहे. जावेद मियांदाद यांनी पंतप्रधान इम्रान यांच्यावर गंभीर आरोप केले असून देशाची आणि क्रिकेटची झालेली दुरवस्था याला इम्रान खान जबाबदार असल्याचे म्हंटले आहे.

इम्रान खान माझ्या मदतीने पंतप्रधान पदावर पोहोचले, मात्र त्यांनी देशाचा विश्वासघात केला असून त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, असे जावेद मियांदाद म्हणाले. युट्युब चॅनेलवर बोलताना मियांदाद यांनी इम्रान यांच्यावर निशाणा साधला असून हिंमत असेल तर यांचे खंडन करून दाखवा, असे आव्हानही दिले. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डात चुकीच्या लोकांची नियुक्ती केल्याचा आरोपही त्यांनी केला.

इम्रान खान स्वतःला देव समजत आहेत आणि वाटेल ते निर्णय घेत आहेत. त्यांना वाटत आहे की, पीसीबीला चालवण्यासाठी देशात सक्षम लोक नाहीत. त्यामुळेच त्यांनी बोर्डात विदेशी लोकांची नियुक्ती केली आहे, असा आरोप मियांदाद यांनी केला. तसेच पंतप्रधान इम्रान खान यांज जाणूनबुजून डिपार्टमेंट क्रिकेट बंद केले असून यामुळे स्थानिक खेळाडून बेरोजगार झाले, असा आरोपही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या