कुपवाडामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमकीत चार जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमधील हंदवाडा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान व दोन पोलीस शहीद झाले आहेत.  या चकमकीत पाचहून अधिक जवान जखमी झाले आहेत. अद्याप ही चकमक सुरू असल्याचे समजते.

दरम्यान पाकिस्तानकडून पूँछ, कुपवाडा व राजौरी जिल्ह्यात सतत गोळीबार सुरू आहे. या गोळीबाराला हिंदुस्थानने देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. पाकिस्तान गोळीबारासोबतच उखळी तोफांचा मारा देखील करत आहे.