जयंत पाटील यांनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  त्यांच्या जागी शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत असे समजते. मंगळवारी राष्ट्रवादीची एक बैठक होणार असून त्या बैठकीनंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा होणार आहे.