लाडक्या बहिणीचे अनुदान बंद करता येणार नाही

विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणीच्या अनुदानासाठी कोणतेही निकष न लावता सरसगट सगळय़ा बहिणींना अनुदानाचा लाभ देण्यात आला. त्यामुळे सर्व बहिणींनी निवडणुकीत मतदान केले आहे. आता मात्र निवडणूक जिंकल्यामुळे लाडक्या बहिणींना निकष लावून अनुदान बंद केले तर सरकारने महिलांची फसवणूक केली असे होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींचे अनुदान बंद करता येणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. नरसी नामदेव येथे आज त्यांनी संत नामदेवांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.