अण्णा हजारेंचे तोंड बंद करण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या पाया पडले, जयंत पाटील यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. 25 फेब्रुवारीपासून राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य करायच्या असत्या तर या दोन्ही अधिवेशनांत विधेयक मांडून त्यावर चर्चा करता आली असती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांचे तोंड पुढील नऊ महिने बंद ठेवण्यासाठी ते त्यांच्या पाया पडले अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे बोलताना केली.